Tuesday, July 7, 2015

आयुष्यात कधी कधी झुकावं.....होणारा बदल हा विचार करण्याजोगा असतो


त्या दिवशी एकांतात बसलो होतो, काहीतरी लिहायचं म्हणुन डोक्यात होत पण लिखाण कश्यावर करायचं हे काही सुचत नव्हतं. अर्धा पाऊन तास होऊन गेला पण तरीही असा कोणताच्‌ विषय सापडला नाही म्हणुन मग पुर्ण रुम मधे नजर फिरवली की काही तरी सुचेल तर सर्वात आधी लक्ष गेलं ते पंख्याकडे. कोणतेही लिखाण करायच्या आधी माझा कल हाच्‌ की मजकुर कसाही असो पण त्या मधुन निष्कर्ष मात्र चांगलाच्‌ निघायला हवा. त्याच्‌ दृष्टीने मग विचार केला आणि, “आयुष्यात कधी कधी झुकाव....” ह्या विषयावर दोन वास्तवीक परीस्थीतीवर केलेलं हे “ तुलनात्म्क ” लेखण.

सहज म्हणुन मी पंख्याला एक प्रश्न विचारला, कसा काय तु इतक्या गतीने तासंतास फिरत असतो ?. डोळ्यांसमोर पंख्याची पाते दिसत असल्यानं उत्तर त्यांच्याकडुन येईल असं अपेक्षीत होतं, म्हणुन माझ लक्ष त्यांच्याकडेच लागुन होतं. आणि झालं हे वेग़ळच्‌ कारण उत्तर आलं हे खरं पण ते मध्य भागी असलेल्या त्या यंत्राकडुन, “आपण हे मला विचारा कारण या पात्यांचं काम फक्त फिरायचं असतं, त्याला कसं आणि कीती वेळ फीरवायचं हे माझ्या हातात असतं” म्हणणं पटलं मला आणि मी रुम सोडुन बाहेर पडणारच्‌ तोच्‌ आवाज आला, थोडं बघीतलं तर पंख्याचं एक पातं हे ढिलं झालेलं माझ्या लक्ष्यात आलं म्हणुन मी ते पुन्हा बरोबर लावण्याच्या हेतुने काढुन घेतलं. उरलेल्या दोन्ही पात्या जणु याच्‌ क्षणाची वाट बघत असाव्यात असं वाटलं कारण तितक्याच्‌ जोमाने त्यानी, “ मगाशी आपण केलेला प्रश्न पुन्हा कराल काय असं विचारलं ”. काय सुरु होतं, हे मला त्यावेळेस समझलं जेव्हा, मी प्रश्न विचारल्यावर यावेळेला उत्तर हे त्या छोट्या नटांनी दिलं, “ कोण काय करतं हे मला माहीती नाही, पण जर मी आधार सोडला तर आत बसलेल्या या यंत्राने कीतीही जोर लावला तरी उपयोग मात्र काहीही होणार नाही ”. असं म्हणताच्‌ त्या सर्वांमधे जनु काही भांडणं सुरु झाली की काय असं मला वाटलं, नंतर लाईट गेल्याने सगळे एकदम शांतं झाले. तिथुन परत जाताना मला मात्र हे कळलं होतं की पंख्याच्या तासंतास फिरन्यामधे कुणाचं कीती योगदान होतं ते, आणि लाईटच्‌ नसली तर्‌ यांचा उपयोग कीती ते. समाधान कारक उत्तर न भेटल्याने तोच प्रश्न घेऊन मी एका नाट्य कंपनीत काम करत असलेल्या मित्राकडे गेलो, त्यालाही विचारलं की कसं काय इतक्या कमी वेळात इतक्या सोप्या पध्धतीने तु आपला विषय लोकांसमोर मांडतो, तर त्याने डायरेक्टरला पुर्ण श्रेय देत विषय मोडका केला. डायरेक्टरला विचारलं तर त्याने कॅमेरा कडे बोट दाखवत त्यांना ते श्रेय दिलं…..असं हे एकापासुन दुसर्‌याकडे चालत गेलं. हे सर्वकाही पहात असलेल्या एका व्यक्तीने मला बोलाउन हाच प्रश्न त्यांच्याच एखाद्या फ्लॉप झालेल्या नाटकांबद्दल त्यांना विचार म्हणुन मला परत पाठवलं, मी तस केलं त्यावेळेस खर तर योग्य अस उत्तर मला सापडलं, कारण यावेळेला माझ्या मित्रापासुन तर त्या कॅमेरामॅन पर्यंत आणि कॅमेरामॅन कडुन तर अजुनक दुसर्‌यापर्यंत चा क्रम तोच होता मात्र उद्देश्य हा दुसरा.


आता जर आपण विचार केला तर, हे लक्ष्यात येईल, की पंख्याचा प्रसंग आणि नाट्यसमुहात घडलेला प्रसंग या दोन्ही वेळेस एकमेकांकडे बोटं ही दाखवली गेली,फक्त उद्देश हा दुसरा होता. तर यातुन निष्कर्ष सांगायचं हा इतकाच्‌ की प्रसंग काहीही असो, याच्याकडुन त्याच्याकडे बोट दाखवण्याची सवय ही कधीही जाणार नाही. यामधे कीत्तेकदा आपण स्वत: सापडले जाऊ. आता हा आपला माणवी स्वभावच्‌ की, आपण कधीही आपलं श्रेय कुणाला देणार नाही आणि यात काहीही चुकीचं नाही, पण ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्यामुळे चांगली झाली असेल त्यावेळेस मात्र हाच्‌ बोट एखाद्या कडे दाखउन त्याला मान देऊन जर आपल्याला अजुन वर जाता येत असेल तर ही वेळ आपण गमवु नये. कारण यात जरी आपला स्वार्थ असला तरी त्यामुळे एखाद्याची मान उंचावत असते हे ही तेवढच्‌ महत्वाचं असते. आणि यामुळेच कधी कधी कुणासमोर झुकुन बघावं……होणारा बदल  हा खरच्‌ विचार करण्या जोगा असतो. इथे झुकनं म्हणजे कोनाच्या अधीन जावं असं नाही,तर कधी कधी स्वत:ला कमी लेखुन एखाद्याला वर चढण्याची संधी द्यावी असा आहे. या मुळे होतं असं की आपल्या सोबत तो व्यक्तीही वर येतो आणि त्याच्या आयुष्यात आपली जागा ही कायम स्वरुपी होऊन जाते.  

साल नया पर ख्वाब वही . . .

चलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न  लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...