Monday, July 6, 2015

उन्हाळ्याच्या सुट्या आणि मामाचं गावं.....१

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागुन एक महीना जास्त झाला होता, घरी बसुन सुध्धा बोर होत असल्याने आम्ही मामाच्या गावाला जाण्याचा ठरवलं. आज जवळ जवळ चार साडे चार वर्ष झाले असतील, म्ह्णजे सलग बारावीनंतर त्या दिवशी पुन्हा एकदा मामाच्या गावाला जाण्याचा चांस आला. उत्सुकता मामाच्या गावाला जाणाची तर होतीच्‌ पण इतक्या वर्ष्यामधे काय काय बदल झाले असतील याची जास्त होती.  बाबांना काम होती आणि ताईची एक्झाम त्यामुळे फक्त आई आणि मी गावाला जाण्याचं ठरवलं. गाडी नेण्याचा खुप ह्ट्ट धरला पण शेवटी बाबानी आम्हाला बस ने जान्यास सांगीतले. आता बाबांचा आदेश म्हटल्यावर तो मान्य करायचाच्‌ होता. अर्धा तास बस स्टॉप वर वाट बघीतल्या नंतर बस आली आणि आम्ही बसलो, इथे मजेची गोष्ट अशी झाली की आम्हाला पुढ्च्या स्टॉप वर उतरवण्यात आलं. नाही, पैसे नव्हते अश्यातली गोष्ट नव्हती तर, गावाला जाण्यार्‌या दोन बसेस, आणि मामाचं गाव बायपास वर असल्याने आम्हाला दुसर्‌या बस मधे बसायचं होतं कारण या स्टॉप वर ही बस थांबणारी नव्ह्ती. मग पुन्हा त्या स्टॉप वर काही वेळ थांबलो आणि आलेल्या बस मधे निघालो.बायपास ला बस थांबली आणि एका छोट्या ऑटो मधे आम्ही बायपास क्रॉस केला, खेडे गावात आलो हे पहील्यांदा तेव्हा कळ्लं जेव्हा ऑटोमधे जोरदार डोक्याला मार लागला, आजही थोडं दु:खत असल्यानं ते अजुन मी विसरलेलो नाही. अशेच्‌ अजुन धक्के खात आम्ही गावात पोहोचलो, एक गोष्ट अजुन आवर्जुन सांगायची म्ह्णजे, ख़ेडे गावात कोणी नवीन आलं सर्वजन अशे आतुरतेने पहातात, हे कोण म्हणुन घरी पोह्चे पर्यंत हे असच सुरु होतं. आईच्‌च गाव असल्याने तीला फार काही असा अनुभव आला नसेल.

आता घरी पोचल्यानंतर सर्वात आधी मी काय केलं असेल ? तर मी मोबाईल चारजींगवर लावला आणि नेटवर्क आहे की नाही हे चेक केलं, कारण इथे काही दिवस राहायचं आणि ते ही वाट्सअ‍ॅप शिवाय हे मला काही जमणारं नव्हतं. आणि माझं मुड ऑफ झालं ते यामुळेच्‌ कारण नेटवर्क ची एकही रेष येत नव्हती. मग काय करायचं तर हातपाय धुतले, नाश्ता केला आणि गच्चावर फिरायला गेलो. सायंकाळ्चे ५:३०-६ वाजले असणार, सुर्य मावळत आलेला होता अतीशय सुंदरअसं दृश्य तयार झालं होतं, आणि त्यात मला आठवन आली ती माझ्या चारजींग वर असलेल्या मोबाईलची. खाली गेलो आणि मोबाईल घेऊन पुन्हा गच्चावर आलो. थोड्या वेळाने टुंग‌‌‌-टुंग असा आवाज आला, पहातो तर एक मॅसेज आलेला होता,You have 4 miss calls from sarang”.  मॅसेज वाचला आणि मोबाईल आत ठेवणार तोच नेटवर्क असल्याचं माझ्या लक्ष्यात आलं, आता कुठे थोडं बरं वाटत होतं. आणि तेव्हा पासुन मग रोजच मी जेवन झालं की आपली चेयर घेऊन गच्चावर बसायला यायचो……. 

continue…..


साल नया पर ख्वाब वही . . .

चलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न  लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...