Friday, July 24, 2015

निर्णय हे वयानुसार की वयात आल्यावर घ्यावेत ?

असं कोणालाच्‌ वाटत नसेल की आपण घेतलेल्या निर्णयावर आपल्याला कधी पश्ताताप व्हावा, पण अनेकदा असं होतं, समोर गेल्यानंतर आपल्याला याची जाणीव होते, त्याचा उपयोग मात्र काहीच नसतो. तुमची एखादी लहान पणीचीच्‌ गोष्ट घ्या ज्याचा विचार जेव्हा तुम्हाला आज येतो तेव्हा तुम्हाला काही न केल्याची खंत वाटते. आपल्यापैकी अनेकां सोबत असही होत असेल, कि एखादी गोष्ट करण्यासाठी एकतर आपलं वय  लहान पडतं किंवा ते करण्याचं वय निघुन गेलेलं असते. कीतीतरी वेळा आपल्या त्या एका निर्णयात आपलं  अख्ख आयुष्य बदलन्याची क्षमता असते पण तसं करण्यात आपण चुकतो. मग होतं काय तर कुन्या दुसर्‍या एखाद्याला आपण त्यासाठी कोसतो हे समझुन कि त्यांच्यामुळे आपण हे करु शकलो नाही वगरे वगरे.......

हे सर्व काही घडतं ते फक्त कधी तरी आपण न केलेल्या हिंमती मुळे किंवा ही वेळ योग्य नाही या समजुती मुळे. आता मला सांगा की जर येणार्‍या प्रत्येक टप्यात आपण आपल्याला स्वत:ला योग्य वाटणारे निर्णय घेत गेलो तर येणार्‍या काळात जे काही होईल त्याचं श्रेय हे आपल्याला स्वत:ला मिळेल, आणि समझा काही नाहीच्‌ झालं तरी त्याला जवाबदार फक्त आपणच्‌ राहु. यामुळे होईल असं की, जो वेळ आपण दुसर्‍यांवर खापर फोडण्यात घालवायचो तो वेळ तर वाचेलच्‌ शिवाय त्यामुळे एकमेकांत येणारे दुरावे देखील थांबतील. एका वयात आल्यानंतर इतकी क्षमता आपल्यात असते कि काय वाईट आणि काय चांगलं हे आपण ओळखू शकु मग दुसरा कोणी तरी येइल आणि आपल्यासाठी काय योग्य हे सांगेल मग आपण त्याप्रमाने चालायला लागु हे कशाला हवं. आणि जिथे योग्य आहे तिथे आपण मोठ्यांचा सल्ला हा घेणारच्‌.

आपलं प्रत्येक पाउल हे समोरच्या पावलाची जागा निश्चित करत असतं हे मात्र तितकच्‌ खरं. तेव्हा वेळ निघुन गेल्यानंतर अर्थातच्‌ वयात असल्यावर कि वयात येताना आपण निर्णय घ्यावा याचा योग्य विचार तो आजच्‌ करायला हवा. कारण शेवटी कितीही झालं तरी एकदा निघुन गेलेली वेळ ही पुन्हा येत नसते हे तितकच्‌ खरं.

साल नया पर ख्वाब वही . . .

चलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न  लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...