Thursday, July 16, 2015

वाट चालुनी थकलो देवा......

वाट चालुनी थकलो देवा, डोळे मिटाया लागले माझे,
पडलो किती अन्‌ ऊठलो किती, आठवती रडे हे मन माझे,
सोबत फक्त होती तुझी, प्रवास सुरु हा एकटा केला,
भेटले किती अन्‌ किती सोडुन गेले, आठवती रडे हे मन माझे.

लोकांच्या या गर्दीत शोधुनी नमस्कार हा दगडाला केला,
आहेस तु हे दाखव देवा, मागणी एकच करतो मी,
भला माणुस हा वाईट झाला, निष्कर्श त्याने हा वेगळा केला,
असशील तु ही आस आहे, विश्वास म्हणुनी करतो मी,
आहेस तु हे दाखव देवा, मागणी एकच करतो मी.


लोभ ना कधी केला कश्याचा, भेटले ते होते पुरे,
व्यसनी लागलो गरजांच्या माझ्या, सुख हे शोधन्या पोटी,
वाढत गेली कधी भूक माझी, ना माझेच कधी मला समजले,
वेळ आता निघुन गेली अन्‌ चुक माझ्या ध्यानी आली,
अतीरेक कधीही नको कश्याच्या, समजले हे मात्र तितके खरे.


जाण्याची आता वेळ आली, गहीवरुन आले माझे मन,
क्षणात आठवल्या आठवनी माझ्या, कळेना कोणास द्यावे अलिंगन,
चुका माझ्याही बर्‍याच होत्या, पण पुण्य होते ते हावी झाले,
इच्छा तुला बघन्याची होती, निघता निघता झाले दर्शन,
देवा वाट चालुनी थकलो होतो, भेटुन मोकळे झाले माझे हे मन.  

साल नया पर ख्वाब वही . . .

चलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न  लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...