Monday, July 6, 2015

उन्हाळ्याच्या सुट्या आणि मामाचं गावं.....२

.....आज लवकरच जाग आली,आंघोळ करुन मी गच्चावर जायला निघालो तर मामाने खालुन आवाज दिला शेतावर चलतोय का म्हणुन. कोणी सोबतच्‌ नसल्यानं दिवसभर घरी तसही बोर मारायचं म्ह्णुन मग शेतावर गेलो. ४ वर्षाआधी जेव्हा आम्ही आईसोबत यायचो तेव्हा घरी जायच्या आधी आम्ही शेतावर जायचो, कारण एकच होतं ते म्हणजे संत्राची बाग, जी आता नव्हती, म्हणुन आज अशी काही उस्तुकता नव्ह्ती आणि पाऊसही मागच्या काही दिवसां पासुन आला नसल्याने फार अशी हिरवळ पण नव्ह्ती. जाताना काही शेतं तर अशी बघीतली जी पुर्ण पणे कोरडी पडलेली. म्ह्णजे आपल्या शेतात जर पाण्याची सोय नसली तर काय स्तिथी होते हे त्या शेतांकडे बघुन माझ्या चांगलं ल्क्ष्यात आलं होतं. रोज शेतात जाताना अश्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.

आई सुध्धा पुष्कळ दिवसांनी गावाला आली होती त्यामुळे अनेक जनांनी पाहुंचार केलेला होता.पण आता मागच्या ५-६ दिवसांपाअसुन सतत हे असच सुरु होतं, त्यामुळे तेही आता बोर व्हायला सुरवात झाली होती. ११ दिवसांच्या या टुर मधे खुप काही शिकायला भेटलं, मी स्वत: मिर्ची आणि टोमॅटो ची लावन सुध्धा केली.मामाच्या लहान मुला सोबत खेळायला पण तेवढीच मजा आली. या सगळ्या गोष्टींमधे मला एक समझलं होतं ते म्हणजे आता खेडे गावही मागे राहीलेली नव्ह्ती, कॉन्वेंट, शाळा, बॅंक अश्या सर्व सोई ईथे होत्या. एकुन काय तर या ४ वर्षात झालेला हा बदल खरच्‌ खुप मोठा होता. परत जाताना या सर्व गोष्टी पुन्हा काही वर्षानी पहायला येण्याची इछा घेऊन मी आणि आई नागपुर ला यायला निघालो. पण या वेळेस बस स्टॉप पर्यंत मी मामाला गाडीने सोडुन मागीतलं कारण जाताना जे डोक्याला लागलं होतं ते अजुनही मी विसरलो नव्ह्तो.....

साल नया पर ख्वाब वही . . .

चलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न  लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...