Sunday, June 21, 2015

“कट्‌टा” One of the Best Parts of My Life….

कोणी आपल्यासाठी कीती महत्वाचं आहे, हे ते आपल्याजवळ नसतांना आपल्या लक्ष्यात येतं, कोणी असं असतं ज्यांच्या सोबत असताना आपल्याला वेळेचं भान नसतं, दिवसातुन कीती तरी वेळा त्यांच्याशी भांडणं होतात,  मग मुद्दामच एखादं काम काढुन आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. फोन करायचा असला तर हा विचार कधीच् नसतो की ते फोन उचलायला खाली असतील कींवा नाही बिंधास्त त्यांना फोन करायचा आणि नाही उचलला की राग पण खुप करायचा. कॉलेज मधे कोन कोन येणार या पेक्ष्या आपल्या गृपमधे एखादा का आला नाही याच्या चर्चा जास्त व्हायच्या, या सर्व गोष्टी ज्यांना लागु होतात असा माझ्या अभियांत्रीकेच्या तिसर्‌या वर्षाला तयार झालेला आमचा गृप “कट्‌टा”.

दिल्ली, शिमला, मनाली असा आमचा इंड्स्ट्रीयल टुर तिसर्‌या वर्षाला गेलेला होता. काही झणांनी येण्यास नकार दिला पण त्यांनाही तयार करुन आम्ही टुर साठी निघालो. कदाचीत कोणीही या गृप मधला सुटुनये म्हणुनच सर्व झण यायला तयार झाले असावे, कारण “कट्‌टा” हा गृप याच टुर मधेच्‌ तयार झालेला होता. एकुन १८ मित्रांचा असा हा गृप फार कमी वेळात एकमेकांत गुंतून गेलेला होता. म्ह्णजे एखादी गोष्ट मला स्वत:ला करायची आहे हा विचारच्‌ न्ह्वता, प्रत्तेक वेळेस कोणी ना कोणी सोबतीला असायचं, मग ते अभ्यासातलं असो किंवा कॅन्टीन मधला चहा असो. प्रत्तेकांच्या बाबतीत्‌ काही तरी वेगळं आणि शिकण्या जोगं. रोजच्‌ कोणाची तरी फजीती व्हायची आणि प्रत्तेकांची वेळ येणार हे नक्की म्ह्णुन इतरांच्या वेळेस खुप मजा करुन घ्यायची कारण आपल्या वेळेस बाकीचेही हेच करणार हे माहीती असायचं. भांडणं कीतीही झाले असले तरी ते केवळ आमच्या मैत्रीचाच भाग होता कारण त्या मुळे तयार झालेल्या आठवणीं मुळेच आज चेहर्‌यावर हास्य येतं. असं हे सर्व एकदम मजेत त्या दिवसा पासुन आजपर्यंत असच्‌ सुरु आहे.

येणारा वेळ हा असाच्‌ असायला हवा असं नेहमी वाटतं कारण आज जेव्हा मागे वळुन पहातो तेव्हा “कट्‌टा” शिवाय केलेली इंजिनीयरींग केवळ निरस आणि अर्धवट वाटते, आणि अश्या मित्रांची संगत भेटनं ही एक मह्त्वाची बाब होती हे आज लक्ष्यात येते.......                 

साल नया पर ख्वाब वही . . .

चलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न  लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...