Saturday, June 20, 2015

“फादर्स डे”

लहानपनी जेव्हा बोलायला सुरवात केली तेव्हा पहीला शब्द “ आई ” म्ह्टला की “बाबा” हे मला आठवत नाही, प्रत्तेक वेळेस अड्चनी आल्या तेव्हा कधी  हाक आईला तर कधी बाबाला दिली, पडलो तेव्हा तोंडुन “ आईगं ” निघालं हे नक्की पण दवाखान्यात जाण्या साठी वाट मात्र “ बाबांचीच ” बघीतली, शाळेत बाई रागवायच्या तेव्हा आठवन आईची यायची पण एखाद्या मुलासोबत भांडण झालं की शाळेत बोलायला मग बाबा यायचे. अश्या कीती तरी घटना जेव्हा आज आठवतात तेव्हा एक गोष्ट लक्ष्यात येते की आयुष्यात दोघांचही महत्व हे सारखच्.

आज “ फादर्स डे ”, म्ह्टलं काही तरी लीहावं पण लिखाण छोट असायला हवं आणि त्यात माझं मत पुर्ण पणे यायला हवं , कोणी वाचायला हाती घेतलं की त्यांच्याही आई-बाबां सोबतच्या आठवनी त्यांच्या डोळ्यांसमोर यायला हव्या. खुप विचार केला मग ठरवलं की काही लिखाण करण्या ऐवजी एखादा “ संकल्प ”  करावा आणि मग तो विचार पक्का केला.

हे सर्व करत असताना माझ्यात झालेला एक बदल माझ्या लक्ष्यात आला की, “ फादर्स डे ” अथवा “ मदर्स डे ” अश्या दिवशी मी वेग़ळ्या प्रकारे वागण्याच्या प्रयत्न करतो,म्हणजे सकाळी उठतांना ठरवायचं की आज काहीही झालं तरी मी आई वर किंवा बाबांवर चीडणार नाही, त्यांनी सांगीतलेली सर्वी कामे करणार......आणि असच् अजुन पुश्कळ काही नियोजीत पणे करायचं मी ठरवतो. इतर दिवशीही माझी वागणुक योग्य अशीच् असते पण या दोन दिवशी काही तरी वेगळं करावं असं सतत वाटतं. आणि म्ह्णुन मी हाच संकल्प केला की इतर दिवशीही मी अश्याच प्रकारे वागण्याचा प्रयत्न करेल.या मुळे कीती बदल होणार याची मला कल्पना नाही पण बदल होणार याची खात्री मात्र नक्की आहे. तुमच्या ही बाबतीत असच् काही तरी असणार......नाही का ?.        

साल नया पर ख्वाब वही . . .

चलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न  लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...