Saturday, June 20, 2015

सवय म्हणावं की आपला स्वभाव ?

जेव्हा एखादी वाईट गोष्ट वारंवार घडत असते मग त्या गोष्टीला विरोध होत असुन सुद्धा योग्य असा उपाय करण्यात जर आपण मागे पडलो तर कालांतराने त्या गोष्टीचं वातावरण तयार होतं. अर्थात सांगायचं म्हणजे ती गोष्ट घडण्याचं प्रमाण वाढत जातं. एक वेळ अशी येते जेव्हा सर्वांना वाट्तं हे आता आवरण्या पलीकडे गेलं आहे. मग कुणीतरी समोर येतं आणि त्याला आळा घालण्याचा प्रयत्न करतो , ही सवयच म्ह्णावं की काय आपल्याला खुप आधी पासनं लागलेली. असो, यात आपलं काही चुकतच् असं नाही पण वाईट त्यावेळेस वाटतं जेव्हा हे लक्ष्यात येतं की ही विरोध करणारी व्यक्ती म्ह्णजे तीच् असते जीच्यावर असं काही घडलेलं असतं आणि आपण बाकीचे फक्त गोष्टीचे धागे-दोरे काढण्यात व्यस्त असतो. खरं पाह्ता ही वेळ अशी असते जेव्हा आपलं काही तरी वेगळं वागणं अपेक्षीत असतं आणि आपण भलतंच् असं काहीतरी वागतो. इथे कोणावरही आक्षेप लावण्याचा उद्देश नाही पण आपण सर्वांनी या वर वीचार करावा हा माझा हेतु मात्र नक्कीच हे लिखान हाती घेण्यापुर्वी होता.
फक्त सवय म्हणुन मोकळ व्हाव इतकं हे सोप नाही कारण सवय ही कालांतराने येत असते पण ही बाब लहाणापासुन मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच अंगी पहायला मिळते, यामुळेच मग कुठेतरी मानवी स्वभावावर प्रश्न उभा रहातो. म्हणजे आपल्यावर एखादी गोष्ट घडली की आपण जोमाने उभे रहातो पण इतरांच्या वेळेस आपला हा उत्साह कमी होतो. आपण विरोध कीतीही केला तरी यात तथ्य मात्र हे आहेच आणि म्हणुनच आज स्वता:मधे बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.                                          

साल नया पर ख्वाब वही . . .

चलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न  लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...