Monday, June 29, 2015

वेळ खरच्‌ निघुन गेली ?

प्रत्येक गोष्टीत स्वत:ला सिद्ध करायचं हि ओढ लहानपणा पासुनच्‌, प्रसंग कुठलाही असो आपली हजेरी तिथे असायचीच्‌. नंबर येणं हा उद्देश कधीच नव्हता आणि कधी आला तर होणारा आनंद हि कधीच न झालेला असायचा. आजपर्यंत येणार्‌या प्रत्येक टप्यात यशस्वी होत गेलो. अडचणीशिवाय तर कधी काम झालच्‌ नाही.आयुष्यातला एक टप्पा आता संपायच्या मार्गावर, पदवी मिळवत आज वयाचा अतिशय महत्वाचा कालावधी आता मागे सुटणार, पुढच्या प्रवासाला सुर्वात करायची म्ह्टलं की मागच्या सर्व गोष्टी झपाट्याने आठवतात आणि मग नेहमी सारखीच्‌ रिकामी वाटते ती एकच्‌ जागा.

विचार करावा तर प्रश्न हाच्‌ पडतो की चुक काही तरी असावी आणि नसेल तर कमी मग ती आपल्यातच्‌ असावी ? वेळ खरच्‌ निघुन गेली हा विचार येताच्‌ डोळे ओलावतात्‌ आणि निष्कर्ष नेहमीचाच्‌ असतो की या गोष्टी फक्त चित्रपटातच्‌ होत असाव्यात. पण मग पुन्हा असं काही तरी डोळ्यांसमोर घडतं आणि हा निष्कर्ष क्षणात तुटतो. त्या गोष्टीची धडपड पुन्हा सुरु होते कारण एक विश्वास नेहमी सोबतीला असतो की, “ज्या गोष्टीचे मोल अधीक असते ती भेटायला योग्य तो वेळ द्यावाच्‌ लागतो”.

येणारे हे सर्वे विचार आणि आधी केलेक्या चुकांची काळजी घेत मी समोर जाताना, हि रिकामी जागा भरणं अत्यंत गरजेचं आहे असं मी मलाच्‌ सांगत असतो.कारण आयुष्य हे एकदाच्‌ मिळत असल्यानं येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायचा असतो.          

Sunday, June 28, 2015

बस ऐसे ही चलना है मुझे….

रोना क्या होता है ये कोई मुझे पुछे तो शायद मै नही बता पाऊंगा,
क्योंकी उसे अक्सर मै छुपाते आया हु,

खुद को सही साबीत करने मे ही वक्त निकलता जा रहा था,
तो गलती मेरी है या नही ये जानना ही छोड दिया मैंने,
ओर हमेशा दुसरो को सही साबीत करने मे लग गया,

आज पर वक्त बदल गया है लगता, क्योंकी आज जब मै वही सबकुछ करता हु
तो लोग हसते है मुझ पर, कहते है जमाना आगे निकल गया और मै वही पर हु,

शायद वो सही कहते है , पिछे हु मै जमाने के ,
क्योंकी गलत ओर सही की समझ मुझे आज भी है,

सोचता हु की अगर छोड दु अपनी आदतो को,
तो क्या मै भी साथ चलने लगुंगा जमाने के ? सवाल आज भी वही है,

कभी वो रफ्तार पकड्ने की कोशीश ही नही की क्योंकी नफरत है मुझे,
“जाकर फीर पलट कर आने की”, डरता हु कही वही ना करना पडे आगे जाकर.

देर लगेगी पर मुकाम सही हासील होगा जीसे सोचकर आगे बढ रहा हु,
रोया ना हु कभी अपनी कोशीशो पर, ना सोचता हु करना पडे कभी मंझील पे पहुचकर.   
 

कोई देख रहा है कही से, ये एक ही सच है जीसे बचपन से मै मानते आया हु,
कारण शायद यही होगा,सही राह पे मै अबतक चलते आया हु.

आखीर मे एक ही गुजारीश है उपरवाले से, कभी कोई गलती ऐसी ही होने देना मेरे हातो से,
जिसके लिये तेरे पास आकर माफी तो भी मांग सकु.  

Tuesday, June 23, 2015

समय.....

रोशन हो रहा है आसमा, उजाले की और ले जायेगा,
रोशनी को फीर पिछे छोड, नजाने कल क्या लायेगा.

बिता हुआ समय शायद अच्‌छा होगा, पर लौट के ना वो आयेगा,
इंतजार तो अब बस उसीका है, क्या क्या नया ये दिखायेगा.

छुने की कोशीश की थी कभी, मेहसुस हुआ था मुझे कुछ,
वापस वही दोहराने गया तो नजारा कुछ और ही था.

समझ गया था एक बात को मै अब, इसकी रचना कैसी थी,
साथ चलो तो जिंदगी थी, वरना हर बात मेरी वो अधुरी थी.

शायद समय ये वही होगा, जीवन मे आपके जो बदलाव लायेगा,
रफ्तार को अपनी धिमा कर इसे छुके देखो तो.

समय भी आपका होगा और लोग भी आपके होगे,बस रुकना ना तुम कभी,
कैसा लगता है हर वो सपना जरा पुरा करके देखो तो.

Sunday, June 21, 2015

“कट्‌टा” One of the Best Parts of My Life….

कोणी आपल्यासाठी कीती महत्वाचं आहे, हे ते आपल्याजवळ नसतांना आपल्या लक्ष्यात येतं, कोणी असं असतं ज्यांच्या सोबत असताना आपल्याला वेळेचं भान नसतं, दिवसातुन कीती तरी वेळा त्यांच्याशी भांडणं होतात,  मग मुद्दामच एखादं काम काढुन आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. फोन करायचा असला तर हा विचार कधीच् नसतो की ते फोन उचलायला खाली असतील कींवा नाही बिंधास्त त्यांना फोन करायचा आणि नाही उचलला की राग पण खुप करायचा. कॉलेज मधे कोन कोन येणार या पेक्ष्या आपल्या गृपमधे एखादा का आला नाही याच्या चर्चा जास्त व्हायच्या, या सर्व गोष्टी ज्यांना लागु होतात असा माझ्या अभियांत्रीकेच्या तिसर्‌या वर्षाला तयार झालेला आमचा गृप “कट्‌टा”.

दिल्ली, शिमला, मनाली असा आमचा इंड्स्ट्रीयल टुर तिसर्‌या वर्षाला गेलेला होता. काही झणांनी येण्यास नकार दिला पण त्यांनाही तयार करुन आम्ही टुर साठी निघालो. कदाचीत कोणीही या गृप मधला सुटुनये म्हणुनच सर्व झण यायला तयार झाले असावे, कारण “कट्‌टा” हा गृप याच टुर मधेच्‌ तयार झालेला होता. एकुन १८ मित्रांचा असा हा गृप फार कमी वेळात एकमेकांत गुंतून गेलेला होता. म्ह्णजे एखादी गोष्ट मला स्वत:ला करायची आहे हा विचारच्‌ न्ह्वता, प्रत्तेक वेळेस कोणी ना कोणी सोबतीला असायचं, मग ते अभ्यासातलं असो किंवा कॅन्टीन मधला चहा असो. प्रत्तेकांच्या बाबतीत्‌ काही तरी वेगळं आणि शिकण्या जोगं. रोजच्‌ कोणाची तरी फजीती व्हायची आणि प्रत्तेकांची वेळ येणार हे नक्की म्ह्णुन इतरांच्या वेळेस खुप मजा करुन घ्यायची कारण आपल्या वेळेस बाकीचेही हेच करणार हे माहीती असायचं. भांडणं कीतीही झाले असले तरी ते केवळ आमच्या मैत्रीचाच भाग होता कारण त्या मुळे तयार झालेल्या आठवणीं मुळेच आज चेहर्‌यावर हास्य येतं. असं हे सर्व एकदम मजेत त्या दिवसा पासुन आजपर्यंत असच्‌ सुरु आहे.

येणारा वेळ हा असाच्‌ असायला हवा असं नेहमी वाटतं कारण आज जेव्हा मागे वळुन पहातो तेव्हा “कट्‌टा” शिवाय केलेली इंजिनीयरींग केवळ निरस आणि अर्धवट वाटते, आणि अश्या मित्रांची संगत भेटनं ही एक मह्त्वाची बाब होती हे आज लक्ष्यात येते.......                 

Saturday, June 20, 2015

“फादर्स डे”

लहानपनी जेव्हा बोलायला सुरवात केली तेव्हा पहीला शब्द “ आई ” म्ह्टला की “बाबा” हे मला आठवत नाही, प्रत्तेक वेळेस अड्चनी आल्या तेव्हा कधी  हाक आईला तर कधी बाबाला दिली, पडलो तेव्हा तोंडुन “ आईगं ” निघालं हे नक्की पण दवाखान्यात जाण्या साठी वाट मात्र “ बाबांचीच ” बघीतली, शाळेत बाई रागवायच्या तेव्हा आठवन आईची यायची पण एखाद्या मुलासोबत भांडण झालं की शाळेत बोलायला मग बाबा यायचे. अश्या कीती तरी घटना जेव्हा आज आठवतात तेव्हा एक गोष्ट लक्ष्यात येते की आयुष्यात दोघांचही महत्व हे सारखच्.

आज “ फादर्स डे ”, म्ह्टलं काही तरी लीहावं पण लिखाण छोट असायला हवं आणि त्यात माझं मत पुर्ण पणे यायला हवं , कोणी वाचायला हाती घेतलं की त्यांच्याही आई-बाबां सोबतच्या आठवनी त्यांच्या डोळ्यांसमोर यायला हव्या. खुप विचार केला मग ठरवलं की काही लिखाण करण्या ऐवजी एखादा “ संकल्प ”  करावा आणि मग तो विचार पक्का केला.

हे सर्व करत असताना माझ्यात झालेला एक बदल माझ्या लक्ष्यात आला की, “ फादर्स डे ” अथवा “ मदर्स डे ” अश्या दिवशी मी वेग़ळ्या प्रकारे वागण्याच्या प्रयत्न करतो,म्हणजे सकाळी उठतांना ठरवायचं की आज काहीही झालं तरी मी आई वर किंवा बाबांवर चीडणार नाही, त्यांनी सांगीतलेली सर्वी कामे करणार......आणि असच् अजुन पुश्कळ काही नियोजीत पणे करायचं मी ठरवतो. इतर दिवशीही माझी वागणुक योग्य अशीच् असते पण या दोन दिवशी काही तरी वेगळं करावं असं सतत वाटतं. आणि म्ह्णुन मी हाच संकल्प केला की इतर दिवशीही मी अश्याच प्रकारे वागण्याचा प्रयत्न करेल.या मुळे कीती बदल होणार याची मला कल्पना नाही पण बदल होणार याची खात्री मात्र नक्की आहे. तुमच्या ही बाबतीत असच् काही तरी असणार......नाही का ?.        

सवय म्हणावं की आपला स्वभाव ?

जेव्हा एखादी वाईट गोष्ट वारंवार घडत असते मग त्या गोष्टीला विरोध होत असुन सुद्धा योग्य असा उपाय करण्यात जर आपण मागे पडलो तर कालांतराने त्या गोष्टीचं वातावरण तयार होतं. अर्थात सांगायचं म्हणजे ती गोष्ट घडण्याचं प्रमाण वाढत जातं. एक वेळ अशी येते जेव्हा सर्वांना वाट्तं हे आता आवरण्या पलीकडे गेलं आहे. मग कुणीतरी समोर येतं आणि त्याला आळा घालण्याचा प्रयत्न करतो , ही सवयच म्ह्णावं की काय आपल्याला खुप आधी पासनं लागलेली. असो, यात आपलं काही चुकतच् असं नाही पण वाईट त्यावेळेस वाटतं जेव्हा हे लक्ष्यात येतं की ही विरोध करणारी व्यक्ती म्ह्णजे तीच् असते जीच्यावर असं काही घडलेलं असतं आणि आपण बाकीचे फक्त गोष्टीचे धागे-दोरे काढण्यात व्यस्त असतो. खरं पाह्ता ही वेळ अशी असते जेव्हा आपलं काही तरी वेगळं वागणं अपेक्षीत असतं आणि आपण भलतंच् असं काहीतरी वागतो. इथे कोणावरही आक्षेप लावण्याचा उद्देश नाही पण आपण सर्वांनी या वर वीचार करावा हा माझा हेतु मात्र नक्कीच हे लिखान हाती घेण्यापुर्वी होता.
फक्त सवय म्हणुन मोकळ व्हाव इतकं हे सोप नाही कारण सवय ही कालांतराने येत असते पण ही बाब लहाणापासुन मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच अंगी पहायला मिळते, यामुळेच मग कुठेतरी मानवी स्वभावावर प्रश्न उभा रहातो. म्हणजे आपल्यावर एखादी गोष्ट घडली की आपण जोमाने उभे रहातो पण इतरांच्या वेळेस आपला हा उत्साह कमी होतो. आपण विरोध कीतीही केला तरी यात तथ्य मात्र हे आहेच आणि म्हणुनच आज स्वता:मधे बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.                                          

साल नया पर ख्वाब वही . . .

चलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न  लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...